प्रवासी विमानातून मालवाहतूक
Updated On:

मुंबई – प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांच्या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी मालवाहतुकीचा आधार घेत आहेत.
इंडिगो कंपनीने लॉकडाऊनच्या काळात 1700 फेऱ्यामधून 14,300 टन मालवाहतूक केली असल्याचे सांगण्यात आले. यासाठी देशात आणि परदेशातही विमाने पाठवण्यात आली असल्याचे इंडिगो कंपनीने म्हटले आहे.
मालवाहतुकीसाठी दहा विमाने उपलब्ध करण्यात आली होती. आगामी काळातही उत्पन्नाचे साधन म्हणून आम्ही ही वाहतूक सुरू ठेवणार आहोत, असे इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणोजय दत्ता यांनी सांगितले.





