पुणे जिल्हा | जेजुरीच्या आनंदी हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेतील उपचार मोफत

जेजुरी (वार्ताहर)- शासनाच्या योजने नुसार व नियमानुसार आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जेजुरी येथील आनंदी हॉस्पिटल येथे सर्व प्रकारच्या आजारावर मोफत सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती आनंदी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख व ग्रामीण संस्थेचे संचालक डॉ. सुमित काकडे यांनी दिली.
जेजुरी येथील आनंदी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शासनाच्या आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत डायलिसिस, हाडांचे आजार व शस्त्रक्रिया, श्वसन व फुफ्फुसाचे विकार व यावरील शस्त्रक्रिया,
पोटांचे आजार व त्यावरील शस्त्रक्रिया, किडनी, मेंदूवरील विकार व शस्त्रक्रिया, मूत्र विकार व मुतखडा शस्त्रक्रिया, कॅन्सर विकार व शस्त्रक्रिया, आदी बाराशे आजारावर शासनाच्या नियमानुसार व योजनेनुसार मोफत व अल्पदरात आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याचे डॉ सुमित काकडे यांनी सांगितले.
सर्वसामान्य रुग्णांसाठी पिवळे व केसरी रेशनकार्ड धारक, आरोग्य कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड धारकांना या आरोग्य सेवेचा मोफत लाभ घेता येणार आहे. आनंदी पुरंदर मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघटना, नागरिक व पत्रकार यांच्या मागणी नुसार ही पुरंदर तालुक्यातील ही पहिली मोफत आरोग्य सेवा सुरू करण्यात आले असल्याचेही डॉ. सुमित काकडे यांनी सांगितले.





