चिंचवडगाव: पंढरपूर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी मोफत औषध सेवा देण्याच्या उपक्रमांतर्गत ‘वुई टुगेदर फाउंडेशन’, ‘चैतन्य फार्मा ग्रुप’ यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर औषधसंग्रह करण्यात आला. गेली १६ वर्षांपासून सातत्याने राबवला जाणारा हा उपक्रम यंदाही लोकसहभागातून पार पडला. औषध सुपूर्तीचा कार्यक्रम चिंचवड येथील यशस्वी क्लासेस हॉलमध्ये पार पडला. या वेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे, ॲड. मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, अजित कुलथे, रवी देशपांडे, नंदू भोगले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक व फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी अजय दर्डा, मोहन कुलकर्णी, शंकर गावडे, मारुती हाके, मंगला डोळे-सपकाळे, रवींद्र सागडे, रोहिणी बच्चे, सोनाली मन्हास, जयंत कुलकर्णी आदींचा सहभाग होता. गोविंद देशपांडे, डॉ. शर्वरी एलगट्टिवार यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी औषधं स्वीकारली. मंगला डोळे-सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर जयंत कुलकर्णी यांनी आभार मानले.