ब्रह्माकुमारीज केशवनगर सेवाकेंद्रच्या वतीने मोफत नेत्र तपासणी

मांजरी – ब्रह्माकुमारीज केशवनगर सेवाकेंद्र मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ३ दिवशीय महाशिवरात्री महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. सर्व उपस्थितांचे स्वागत व सम्मान राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुलोचना व ब्रह्माकुमारी अश्विनी यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वाना ध्यान अनुभूती राजयोगी मुकुल भाई यांनी करविले. दरम्यान मांजरी बुद्रुक परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबीरचे आयोजन केले. या शिबिरांमध्ये 350 लोकांची मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. तर, महाशिवरात्री निमित्त 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन, आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी, प्रभू प्रसाद खिचडी, चिवडा व केळी सर्व भाविकांना वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी साईनाथ एकतारी भजनी मंडळ,मांजराई नगर, विठ्ठल रुख्मिणी भजनी मंडळ, गोडबोले वस्ती, मांजराई देवी भक्ती मंडळ, मांजरी तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगा ना 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचा लाभ देऊन सत्कार करण्यात आला. तीन दिवसांच्या महोत्सवसाठी बहुमोल सेवा सहयोग मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत माजी उपसरपंच अमित घुले, किसान संघाचे ज्ञानेश्वर घुले, तरुण उद्योजक तुषार घुले यांचा लाभला. या महोत्सवात परिसरातील हजारो नागरीकांनी सहभागी होत लाभ घेतला आहे. अशी माहिती अमित घुले यांनी दिली.





