Satara | मराठा समाजाचा शनिवारी मोफत वधू-वर मेळावा

सातारा, (प्रतिनिधी) – आनंदी फाउंडेशन आणि योग मराठा वधू-वर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी, दि. २६ रोजी दसरा चौक, कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन सभागृहात मराठा वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वधू-वर मेळावा सकाळी १० ते दुपारी २:०० असा होणार आहे.
मेळाव्यास सातारा मराठा व्यवसाय संघाचे पांडुरंग अनुगडे वधू-वरांना मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १० ते ११ या वेळेत वधू-वर, पालकांचे आगमन व नाव नोंदणी होईल.
त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात होईल. वधू-वर स्वतः स्टेजवर येऊन आपली माहिती देतील. सामाजिक कार्यकर्ते धीरज जाधव आणि रतन पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल.
मेळाव्यात पसंती झाल्यास पुढे जाऊन प्रत्येकाने सोयरिक करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मेळाव्यास प्रवेश विनामूल्य असून मराठा समाजातील वर, वधू आणि पालकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश पाटील यांनी केले आहे.





