देशात चौथ्या लाटेची एन्ट्री?; देशात नव्या करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ; 24 तासांत 7 हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतनाच दिसत आहे. त्यामुळे करोनाची संभाव्य चौथी लाट देशात आल्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, देशात मागील 24 तासांत 7584 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 24 करोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये करोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात दिवसागणिक मोठी रुग्णवाढ पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू करत नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
#LargestVaccineDrive #Unite2FightCorona #AmritMahotsav@PMOIndia @mansukhmandviya @ianuragthakur @DrBharatippawar @PIB_India @mygovindia @AmritMahotsav @COVIDNewsByMIB @DDNewslive @airnewsalerts pic.twitter.com/toJ8YnSffK
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 10, 2022
देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या 36 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या 36 हजार 267 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर रुग्ण सकारात्मकता दर 0.08 टक्क्यांवर पोहोचला आहे.
गुरुवारी दिवसभरात 3791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 44 हजार 92 रुग्णांनी करोना संसर्गावर मात केली आहे.





