“माझ्यावर चार वेळा…”; हातावर पेनाने सुसाईड नोट लिहित महिला डॅाक्टराने संपवले जीवन, साताऱ्यातील फलटणमध्ये नेमकं काय घडलं?

फलटण : महाराष्ट्राला हादरवणारी घटना साताऱ्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका महिला डॅाक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरिक्षक वारंवार अत्याचार केल्याचे म्हटले आहे.
मानसिक तणातून डॅाक्टर महिलेने टोकाचं पाऊलं उचलत आपले आयुष्य संपवले. या घटनेमुळे फलटण तालुक्यात शोककळा पसरली आहे. डॅा. संपदा मुंङे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये फलटण येथील पोलीस उपनिरिक्षक याच्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे सांगितले आहे. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती.
चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करीन.” तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचे सहकार्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, सुसाईड नोटमध्ये माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला, असे लिहिले आहे.





