nagar | कबड्डीचे एकाच वेळी होणार चार सामने

नगर, (प्रतिनिधी) – ७० व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीकय बड्डी स्पर्धेसाठी कबड्डीमॅटचे भव्य मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन एकाच वेळी चार सामने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. सुमारे ३० हजार प्रेक्षक बसु शकतील, अशी प्रेक्षा गॅलरी उभारण्यात आली आहे.
वाडियापार्क येथील क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा (दि.२१) ते २४ मार्च या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेकडे संपूर्ण जगभरातील, कबड्डी प्रेमाचे लक्ष लागलेले आहे. नगरमध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा होत असुन यात देशातील ३२ राज्याचे संघ सहभागी होणार आहेत. आज तीन राज्याचे संघ नगरमध्ये दाखल झाले असुन उर्वरीत संघ बुधवारपर्यंत नगर शहरात दाखल होणार आहेत.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावरील मैदान तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मॅटचे चार मैदान तयार करण्यात आले असुन एकाचप्रेक्षवेळी चार सामने होणार आहेत. रोज ३० सामने होणार आहे. प्रकाशझोतात सामने होणार असल्याने प्रेक्षकांची मोठी गर्दि होणार आहे.
महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक शांताराम जाधव, व्यवस्थापक शंतनु पांडव, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रा . शशिकांत गाडे , विजय मिस्कीन, प्रकाश बोरूडे, विनायक भुतकर, संतोष घोरपडे, अजय पवार, कृष्णा लांडे, सचिन सप्रे, संतोष गाडे यांनी मैदान उभारणीच्या कामाची पाहणी केली .
राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची मोठी जबाबदारी नगर शहरावर आहे. देशभरातील ८०० खेळाडू नगरमध्ये येणार आहेत. वेगवेगळ्या प्रांतातून ३२ संघ नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांचे आदरातिथ्य आपल्याला करायचे आहे.
राज्य स्तरीय स्पर्धा यशस्वी पणे आयोजन करण्याचा अनुभव आमच्याकडे आहे. त्यामुळे मागीलवेळी राहिलेल्या सर्व त्रुटी भरून काढून उत्कृष्ठ पणे नियोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमी खेळाडुं,कार्यकर्त्यांना आवाहन आहे की ज्यांना स्वयंस्फूर्तीने काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी संघटनेकडे नाव नोंदवून समितीची जबाबदारी घ्यावी, व ही स्पर्धा यशस्वी करण्यास मदत कराप्रा .शशिकांत गाडे उपाध्यक्ष , राज्य कबड्डी संघटना





