U-19 Cricket : विश्वचषकाच्या अंतिम लढतीत पराभूत झाल्यावरही आयसीसीच्या युवा संघात भारताचा डंका…

दुबई – दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढतीत पराभूत झाल्यावरही आयसीसीच्या १९ वर्षांखालील युवा संघात भारताच्याच चार खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले असले तरीही भारताच्या खेळाडूंनी या संघात स्थान मिळवून आयसीसीलाही प्रभावीत केले आहे.
यंदाची स्पर्धा संपल्यानंतर आसीसीने सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करून स्पर्धेचा सर्वोत्तम संघ घोषित केला आहे. भारताच्या उपविजेत्या संघातून निवडलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सचिन दास आणि सौम्य पांडे यांचा समावेश आहे. ह्यू वेबगेनला या संघाचा कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे.
भारताचा कर्णधार सहारन यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ७ सामन्यांच्या एकाच डावात ५६.७१ च्या सरासरीने ३९७ धावा केल्या. त्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचाही समावेश आहे. मुशीर खानने देखील स्पर्धेत चांगली फलंदाजी केली. कर्णधारानंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू होता. त्याने ७ डावात ६० च्या सरासरीने ३६० धावा केल्या. या स्पर्धेत त्याने बॅटमधून २ शतके आणि १ अर्धशतक झळकले.
बीडचा सचिन धस देखील धावा करण्यात आघाडीवर आहे. त्याने ३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सचिनने ७ डावात ६०.६० च्या सरासरीने ३०३ धावा केल्या ज्यात १ शतक आणि १ अर्धशतक आहे. गोलंदाजीत सौम्य पांडेने ७ सामन्यात १०.२७ च्या सरासरीने १८ बळी घेतले. या काळात त्याने तीन वेळा एका डावात ४ बळी घेण्याचा पराक्रमही केला.
IND vs ENG 3rd Test : ‘सर जडेजा’समोर ‘बेझबॉल’ रणनिती फेल, भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय…
या चार भारतीय खेळाडूंव्यतरीक्त या संघात दक्षिण आफ्रिकेचा अल प्रिटोरियस आणि क्वेना माफाका, पाकिस्तानचा उबेद शाह, वेस्ट इंडिजचा नॅथन एडवर्ड्स या खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे. आणि इतर काही दमदार कामगिरी करणारे खेळाडू देखील स्थान मिळवण्यात यशस्वी झाले.





