नवी दिल्ली – “संसदेच्या कामात अडथळला आणला तसेच अध्यक्षांचा अनादर केला”, या कारणावरून सोमवारी लोकसभेतून चार कॉंग्रेस खासदारांना अधिवेशन संपेपर्यंतच्या काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. मनिकम टागोर, रम्या हरिदास, जोथिमणी आणि टीएन प्रतापन अशी या चार कॉंग्रेस खासदारांची नावे आहेत.
नियम 374 नुसार अध्यक्षांशी अनादर दर्शवणारे वर्तन केल्याबद्दल या खासदारांना निलंबित करण्यात येत असल्याचे अध्यक्षांकडून जाहीर करण्यात आले. दरम्यान, सोमवारी विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ आणि घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज चालू शकले नाही.
स्वस्तात परदेशात फिरायचंय? मग ‘या’ देशांचा नक्की विचार करा !
याच गदारोळात लोकसभेने भारतीय अंटार्क्टिक विधेयक, 2022 मंजूर केले, ज्याचे उद्दिष्ट अंटार्क्टिकमधील भारताच्या संशोधन कार्यासाठी एक नियामक फ्रेमवर्क प्रदान करणे आणि अंटार्क्टिक परिसंस्थेचे संरक्षण करणे आहे. हे विधेयक केंद्रीय भूविज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी मांडले.
राष्ट्रपतीपदी विराजमान द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा