Manchar : हुतात्मा बाबू गेनू स्मारक दुरवस्थेविरोधात प्रतिष्ठान आक्रमक
Manchar : याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,घोडेगाव येथील तहसीलदार राहुल सारंग,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले. स्मारकाच्या परिसरातील शिल्प कमान कोसळल्यानंतर पुनर्बांधणी रखडली आहे.

मंचर : स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीच्या चळवळीसाठी बलिदान देणारे हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील शासकीय स्मारकाची दुरवस्था झाली आहे. गेल्या १५ वर्षांपासून देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठाने आक्रमक भूमिका घेतली आहे. १२ डिसेंबर २०२६ पूर्वी स्मारकाची दुरुस्ती व सुशोभीकरण पूर्ण करावे,अन्यथा घोडनदी, कळंब येथे सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी दिला.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,घोडेगाव येथील तहसीलदार राहुल सारंग,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले. स्मारकाच्या परिसरातील शिल्प कमान कोसळल्यानंतर पुनर्बांधणी रखडली आहे. संरक्षक भिंतीची दुरवस्था, इमारतीतील गळती, स्वच्छतागृहांची अस्वच्छता, बंद सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुशोभीकरणाचा अभाव या समस्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत. निवेदन देताना प्रा. वसंतराव भालेराव, अशोक काळे, जितेंद्र भालेराव आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. हुतात्म्याच्या पुण्यतिथीपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक ही आमच्या अस्मितेची आणि देशभक्तीची प्रेरणा आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. १२ डिसेंबरपूर्वी कामे पूर्ण न झाल्यास शेकडो कार्यकर्त्यांसह घोडनदीत सामूहिक जलसमाधी आंदोलन करू.
– बाबाजी चासकर,अध्यक्ष, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान.





