Narendra Modi : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत सेवा पंधरवडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस खास बनवण्यासाठी दिल्ली सरकारकडून राजधानीत सेवा पंधरवडा सुरू केला जाणार आहे, ज्यामध्ये १५ मोठ्या प्रकल्कपांचे उदघाटन केले जाणार आहे. हे कार्यक्रम केवळ उत्सवाचा भाग नसून दिल्लीतील लोकांसाठी नवीन उपलब्धी देखील ठरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १७ सप्टेंबर रोजी त्यागराज स्टेडियममध्ये होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात उपस्थित राहतील. या दरम्यान ते १५ प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यामध्ये नवीन रुग्णालय ब्लॉक, १०१ आरोग्य मंदिरे आणि १५० डायलिसिस केंद्रांचा समावेश आहे. असे मानले जाते की यामुळे आरोग्य सेवांना मोठी चालना मिळेल आणि लोकांना उपचारांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या कार्यक्रमासंदर्भात एक विशेष बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, भाजप खासदार आणि आमदार देखील उपस्थित होते. बैठकीत सेवा पंधरवडाच्या तयारीचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की हे कार्यक्रम दिल्लीच्या विकासाला एक नवी दिशा देतील.
मुख्यमंत्री म्हणाल्या की १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आणि १५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दिल्लीतील लोकांना दररोज एक नवी भेट मिळेल. म्हणजेच एक दिवस नवीन आरोग्य सुविधा आणि दुसऱ्या दिवशी नवीन विकास प्रकल्प. अशाप्रकारे, दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात सलग १५ दिवस कार्यक्रम आणि उद्घाटने होतील.
सेवा तंधरवडा अंतर्गत सुरू होणारी १०१ आरोग्य मंदिरे आणि १५० डायलिसिस केंद्रे विशेष चर्चेत आहेत. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात डायलिसिस रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. आता या नवीन केंद्रांमुळे हजारो लोकांना दिलासा मिळेल. त्याच वेळी, नवीन रुग्णालय ब्लॉकमधून रुग्णांना चांगले उपचार पर्याय मिळतील.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे सर्व प्रकल्प दिल्लीला विकसित दिल्ली बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहेत. त्यांनी असा दावा केला की यामुळे शहराला नवीन गती आणि नवीन उंची मिळेल.





