Amanpreet Singh Gill : क्रीडा विश्वावर शोककळा; विराट कोहलीच्या सहकाऱ्याने ३६व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास
Amanpreet Singh Gill : अमनप्रीत सिंह गिल याने २००० च्या दशकात भारतीय अंडर-१९ संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Amanpreet Singh Gill passes away at 36 : आयपीएल २०२६ च्या हंगामादरम्यान पंजाब क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये खेळलेल्या माजी वेगवान गोलंदाज अमनप्रीत सिंह गिलचे बुधवारी (६ मे) निधन झाले. तो केवळ ३६ वर्षांचा होता. गेल्या सहा महिन्यांपासून आजारी असल्यामुळे त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.
विराट कोहलीसोबत खेळला होता क्रिकेट –
अमनप्रीत सिंह गिल याने २००० च्या दशकात भारतीय अंडर-१९ संघात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २००७ मध्ये तो अंडर-१९ तिरंगी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या संघात त्याच्यासोबत सध्याचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि मनीष पांडे यांचाही समावेश होता. त्या मालिकेत गिलने ५ सामन्यांत ९ विकेट्स घेत आपली छाप पाडली होती.
Punjab Cricket Association deeply mourns the sad demise of Amanpreet Singh Gill, former Punjab cricketer and Member, Senior Selection Committee Punjab.
He served Punjab cricket with dedication and passion, representing teams including India Under-19s, Kings XI Punjab and Punjab.… pic.twitter.com/tpr0EwEprk
— Punjab Cricket Association (@pcacricket) May 6, 2026
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने पंजाबसाठी ६ प्रथम श्रेणी (First-class) सामने खेळत ११ विकेट्स घेतल्या होत्या. २००९ आणि २०१० च्या आयपीएल हंगामात तो किंग्स इलेवन पंजाब (आताचे पंजाब किंग्स) या फ्रँचायझीचा भाग होता, मात्र त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही.
पीसीएकडून शोक व्यक्त आणि पंजाब किंग्सची श्रद्धांजली –
अमनप्रीत सिंह गिलच्या निधनावर पंजाब क्रिकेट असोसिएशनने (PCA) दुःख व्यक्त करत म्हटले आहे की, “अमनप्रीतने अंडर-१९, किंग्स इलेवन पंजाब आणि पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेहमीच लक्षात राहील.”





