Political News : माजी पंतप्रधानांच्या बहिणीला अटक; राजकीय वर्तुळात खळबळ
Political News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या त्यांच्या बहीण अलीमा खान यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी रविवारी ताब्यात घेतले.

Political News : पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी रविवारी इम्रान खान यांची बहीण अलीमा खान यांना ताब्यात घेतले. अलीमा यांना लाहोरमध्ये ताब्यात घेऊन कोट लखपत तुरुंगात हलवण्यात आले. इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी त्या करत आहेत. पुढील आठवड्यात पीटीआय पक्षाने आयोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Political News)
अलीमाला पंजाब सार्वजनिक सुव्यवस्था अध्यादेश, १९६० अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. याकायद्याद्वारे स्थानिक पोलिसांना सार्वजनिक शांततेला धोका वाटणाऱ्या कोणालाही अटक करण्याची परवानगी आहे, लाहोरचे उपायुक्त मुहम्मद अली इजाज यांनी ३० दिवसांच्या कालावधीसाठी अलीमा यांच्या स्थानबद्धतेचा आदेश दिला आहे. (Political News)
अलीमा या घरातून बाहेर पडताच त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि कोट लखपत तुरुंगात हलवण्यात आल्याचे इम्रान यांच्या अन्य भगिनी नोरीन नियाझी यांनी सांगितले. (Political News)
पीटीआयचे केंद्रीय माहिती सचिव शेख वकास अक्रम यांनी या अटकेचा निषेध केला असून, अलीमा यांना तात्काळ न्यायालयात हजर करण्याची मागणी केली आहे. आपल्या भावाच्या बाजूने बोलल्याबद्दल बहिणीला शिक्षा दिली जात आहे, असे अक्रम यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. (Political News)
Political News : काँग्रेसला मोठा धक्का बसणार ! ‘हा’ बडा नेता सोडणार पक्षाची साथ





