हरारे (झिंबाब्वे)- झिम्बाब्वेचे मुक्तिनायक म्हणून अनेक देशांनी दिवंगत माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचे कौतुक केले. मुगाबे यांचे तीव्र टीकाकार असलेल्या ब्रिटनने त्यांच्या राजवटीतील अत्याचार आणि दडपशाहीची आठवण करून दिली. मुगाबे यांनी वसाहतीच्या राजवटीपासून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आपले बहुतेक आयुष्य लोकसेवेत व्यतीत केले, असे नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मू बुहारी म्हणाले. त्यांनी देशाचे संस्थापक जनक म्हणून मुगाबे यांचा गौरवच केला.
आपल्या लोकांच्या राजकीय आणि आर्थिक मुक्तीसाठी संघर्ष करताना मुगाबे यांनी केलेला त्याग भविष्यातील पिढ्यांकडून कायम लक्षात ठेवले जाईल, असे केनियाचे अध्यक्ष उहुरू केन्यट्टा म्हणाले. माजी राष्ट्राध्यक्ष मुगाबे हे एक धैर्यवान व्यक्ती म्हणून आपण लक्षात ठेवू. तो लोकप्रिय नव्हता तरीही त्यांच्यावर विश्वास ठेवलेल्या गोष्टींसाठी लढायला कधीही घाबरला नव्हता, असेही केन्यट्टा म्हणाले.
मुगाबे यांच्या निधनामुळे आफ्रिकेतील एका युगाचा अंत झाला. अफ्रिकेच्या प्रस्थापित अध्यक्षांचा अध्याय बंद झाला. आफ्रिकेतील लोकांची सुटका करण्याची त्यांची वचनबद्धता कायमच उल्लेखनीय राहिली, असे 2002 ते 2013 या काळात केनियाचे अध्यक्ष राहिलेले म्वाइ किबाकी म्हणाले.
मुगाबे हे झिम्बाब्वेचे राष्ट्रीय मुक्ती चळवळीचे एक उत्कृष्ट नेते आणि राजकारणी होते, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले.
नामिबियाचे अध्यक्ष हेगे गींगोब यांनी योद्धा म्हणून मुगाबे यांचे वर्णन केले. झिम्बाब्वेने ब्रिटनमधून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेऊन दशकभरानंतर 1990 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून नामिबियाने स्वातंत्र्य मिळवले होते.