UK : मनमोहन सिंग यांचा ब्रिटनमध्ये ‘जीावनगौरव’ पुरस्काराने गौरव

लंडन – भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना लंडनमध्ये जीवन गौरव पुरस्काराने अलिकडेच सन्मानित करण्यात आले. ब्रिटनमधील “इंडीया-युके अचिव्हर्स हॉनर्स’च्यावतीने डॉ. मनमोहन सिंग यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. अर्थकारण आणि राजकारणातील अनन्यसादारण योगदानाबद्दल त्यांना या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. “नॅशनल इंडियन स्टुडंटस ऍन्ड ऍल्युमनी युनियन’ या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्यावतीने हा पुरस्कार नंतर डॉ. मनमोहन सिंग यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे.
“द इंडिया -युके अचिव्हर्स हॉनर्स’ हा पुरस्कार ब्रिटीश कौन्सिल ऑफ इंडिया आणि ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या सहयोगातून दिला जात असतो. ब्रिटनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी हा पुरस्कार दिला जात असतो. डॉ. मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांतून शिक्षण घेतलेले असल्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
आपल्या देशाचे भवितव्य असलेले आणि दोन्ही देशांमधील दुवा असलेल्या युवकांकडून हा पुरस्कार मिळत असल्याबद्दल आपल्याला खूप आनंद होतो आहे, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या लेखी प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे. भारत आणि ब्रिटनदरम्यानचे संबंध शैक्षणिक कारणामुळे अधिक दृढ झाले आहेत. महात्मा गंधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि अशा इतर अनेकांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर ते मोठे नेते बनले. त्यांचा वारसा सर्व भारताला आणि जगालाही प्रेरणा देत आहे. आतापर्यंत लाखो बारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये शिक्षणाची संधी मिळाली आहे, असे डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/missing-radioactive-capsule-sparks-urgent-health-alert-in-western-australia/
75 मान्यवरांचा सन्मान…
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतो आहे. याशिवाय भारत- ब्रिटन संबंध दृढ करणाऱ्या काही विशेष मान्यवरांना देखील सन्मानित करण्यात येते आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते राघव चढ्डा, सिरम इन्स्टियुटचे सीईओ आदर पुनावाला आणि बारतीय महिला फुटबॉल संघाची गोलकिपर आदिती चौहान यांचाही समावेश आहे.





