Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप! माजी आमदारासह 25 हजार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून अहमदपूर येथे झालेल्या भव्य मेळाव्यात माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल 25 हजार कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा असल्याचा दावा केला. लोकांनी कोणत्याही दबावाशिवाय आणि केवळ प्रेमापोटी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
एकनाथ शिंदे म्हणाले, आज 25 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. ही गर्दी कुणी जमवून आणलेली नाही. विरोधकांनी प्रत्यक्ष येथे येऊन जनतेचा उत्साह पाहावा. विनायक पाटील यांच्या कार्यावर प्रेम करणारे हजारो लोक आज शिवसेनेसोबत आले आहेत.” (Maharashtra Politics)
📍 #लातूर |
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे #शिवसेना पक्षाच्या वतीने विराट मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा आज संपन्न झाला. यावेळी माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल २५ हजार कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
आजचा पक्षप्रवेश सोहळा हा आतापर्यंतचा… pic.twitter.com/dOjL4Weaio
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 28, 2026
यावेळी शिंदे यांनी विनायक पाटील यांचे कौतुक करत त्यांना अनुभवी आणि विकासाभिमुख नेता असल्याचे म्हटले. “विनायक पाटील यांनी मंत्री आणि आमदार म्हणून प्रभावी काम केले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे विकासाच्या राजकारणाला आणखी बळ मिळणार आहे,” असेही ते म्हणाले. (Maharashtra Politics)
या कार्यक्रमात शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे, आमदार बच्चू कडू, आनंद परांजपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार हेमंत पाटील, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि शिवसेनेचे पदाधिकारी, महिला, युवक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Maharashtra Politics)
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी हा मोठा राजकीय बूस्टर मानला जात आहे. (Maharashtra Politics)





