Pune Liquor Case : पुण्यातील विषारी दारूकांडाची धक्कादायक कहाणी! आतापर्यंत 13 जणांना गिळलं
Pune Liquor Case : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या 'विषारी दारूकांडा'मागील अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे.

Pune Liquor Case : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडामागील धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक नफा कमावण्याच्या हव्यासापोटी दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याने ती विषारी बनली आणि आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune Liquor Case)
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, उरळी कांचन परिसरातील राधेश्याम प्रजापती हा अवैध दारू तयार करण्याचे काम करत होता. त्याच्याकडून दारू खरेदी करणारा योगेश वानखेडे हा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणी तिची विक्री करत होता. अधिक नफा मिळवण्यासाठी योगेशने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचा आरोप आहे. त्यामुळे दारूचे प्रमाण वाढले, मात्र मिथेनॉलचे प्रमाण जास्त झाल्याने ती जीवघेणी ठरली. (Pune Liquor Case)
ही विषारी दारू पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी, पुण्यातील खडकी, वडारवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरात विक्रीसाठी पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. याच दारूच्या सेवनामुळे अनेकांना विषबाधा झाली आणि मृत्यूचे सत्र सुरू झाले. (Pune Liquor Case)
या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सहा तर पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही जणांचा शोध सुरू आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये ८ आणि पुण्यात ५ असे एकूण १३ मृत्यू नोंदवले गेले आहेत. मात्र मृतांचा आकडा अधिक असू शकतो, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. (Pune Liquor Case)
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. “विषारी दारू तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असून आणखी आरोपींवर कारवाई होईल. हा प्रकार म्हणजे एकप्रकारे हत्या असून दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Pune Liquor Case)
या प्रकरणातील अनेक मृतांमध्ये समान लक्षणे आढळून आली आहेत. तोंडाला फेस येणे, अचानक बेशुद्ध पडणे आणि प्रकृती झपाट्याने खालावणे अशी लक्षणे दिसून आली. त्यामुळे विषारी दारूच्या या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून अवैध दारू व्यवसायावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (Pune Liquor Case)





