Maharashtra Politics : मोठी घडामोड..! शरद पवारांना जबर धक्का; ‘या’ माजी मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात एक अत्यंत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. तनपुरे यांच्या या निर्णयामुळे शरद पवार यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. (Maharashtra Politics)
प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर बोलताना तनपुरे यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानले आणि पक्षाकडून मिळणारी कोणतीही जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडणार असल्याचे सांगितले. “पक्ष जी जबाबदारी देईल ती मी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडेन,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
राजकीय वर्तुळात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा रंगली असून प्राजक्त तनपुरे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. (Maharashtra Politics)
प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख युवा नेत्यांपैकी एक मानले जात होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली होती. विशेष म्हणजे पहिल्याच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळवले होते. राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. (Maharashtra Politics)
तनपुरे यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे अनेक वर्षे आमदार राहिले असून त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याशीही त्यांचे जवळचे कौटुंबिक नाते आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत होती. (Maharashtra Politics)
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षांतरामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपला अहमदनगरसह पश्चिम महाराष्ट्रात बळकटी मिळण्यास मदत होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. (Maharashtra Politics)


