Deepak Kesarkar | मुंबईतील पवई येथे रोहित आर्याने आर.ए.स्टुडिओमध्ये आर्थिक व्यवहारांशी संबंधित मागण्यांवरून १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवले होते. शिक्षण विभागासाठी केलेल्या कामाच्या थकबाकीमुळे हे कृत्य केल्याचा दावा रोहित आर्याने केला होता. ज्याचा व्हिडिओ शेअर करत त्याने ही माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोहित आर्यचा मृत्यू झाला आणि पीडित मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेदरम्यान रोहित आर्याला समजावणारे अधिकारी, स्टुडिओला भेट दिलेल्या कलाकारांसह तत्कालीन शिक्षणमंत्रीमंत्री दीपक केसरकर यांची चौकशी करून जबाब नोंदविण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीस रोहित आर्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी रोहितने माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधून बोलण्याची मागणी केली होती. परंतु केसरकर यांनी त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची कबुली केसरकर यांनी दिली असून असे का केले? यामागचा खुलासा देखील त्यांनी केला आहे. मंत्री नाही, म्हणून रोहित आर्यासोबत… याबाबत केसरकर म्हणाले, “मी सध्या मंत्री नाही, म्हणून रोहित आर्याशी बोलून त्याला कोणंतही ठोस आश्वासन देऊ शकत नव्हतो. मुलं ओलिस असताना आर्य याला ठोस आश्वासन देणं गरजेचं होतं. म्हणूनच संबंधित मंत्री किंवा शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी यांच्याशी त्याने बोलावं अशी सूचना मी पोलिसांना दिली होती,” असं केसरकर यांनी म्हटलं. . Deepak Kesarkar | यावेळी त्यांनी तपासामध्ये सहकार्य करणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे आता याप्रकरणात दीपक केसरकर काय जबाब नोंदवणार पाहणं महत्वाचं ठरेल. हेही वाचा : आलिया आणि शर्वरीच्या ‘अल्फा’ चित्रपटासाठी करावी लागणार प्रतिक्षा; रिलीज डेटमध्ये बदल