Manjot Kalra Arrested : क्रिकेट विश्वात खळबळ! भारताला U-19 विश्वचषक जिंकवणाऱ्या खेळाडूला श्रीलंकेत अटक; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Manjot Kalra Arrested : भारताच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि लंका प्रीमियर लीग मधील 'जाफना किंग्स' फ्रँचायझीचा सह-मालक मनजोत कालरा याला श्रीलंकेत अटक करण्यात आली आहे.

Manjot Kalra Arrested in Sri Lanka LPL Match Fixing Bribery Jaffna Kings : एकीकडे शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत असून २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करत आहे. मात्र, दुसरीकडे गिलसोबत विश्वचषक जिंकणारा त्याचाच एक माजी सहकारी अत्यंत गंभीर वादात अडकला असून त्याला परदेशात अटक करण्यात आली आहे. भारताच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि लंका प्रीमियर लीग मधील ‘जाफना किंग्स’ फ्रँचायझीचा सह-मालक मनजोत कालरा याला श्रीलंकेत अटक करण्यात आली आहे. खेळाडूंना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप त्याच्यावर आहे.
एलपीएल सुरू होण्यापूर्वीच कोलंबोच्या हॉटेलमधून अटक!
लंका प्रीमियर लीगचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वीच, शुक्रवार १७ जुलै रोजी कोलंबो येथील एका उच्चभ्रू हॉटेलमधून मनजोत कालराला ताब्यात घेण्यात आले. श्रीलंका पोलिसांच्या ‘स्पोर्ट्स इन्व्हेस्टिगेशन युनिट’ने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक सुपुन विदानगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कालरा एका खेळाडूला सुमारे ९५ लाख श्रीलंकेचे रुपये (भारतीय चलनानुसार सुमारे २७.७ लाख रुपये) लाच म्हणून देण्याच्या तयारीत होता.
🚨 REPORTS 🚨
Former India U-19 World Cup winner and Jaffna Kings co-owner Manjot Kalra has been arrested by the Sri Lankan police over an alleged match-fixing approach made by a player.
(Source: NewsWire)#LPL2026 #SriLanka #Sportskeeda pic.twitter.com/lfWmhXrBix
— Sportskeeda (@Sportskeeda) July 17, 2026
पोलिसांनी सांगितले की, ज्या खेळाडूला लाच देण्याचा प्रयत्न झाला, त्यानेच १० दिवसांपूर्वी पोलिसांत याची तक्रार केली होती. जाफना किंग्सच्या या मालकाने पहिल्यांदा संपर्क साधल्यापासूनच पोलीस त्याच्यावर पाळत ठेवून होते. कालराने इतर दोन खेळाडूंशीही संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सध्या खेळाडूंची नावे गुप्त ठेवण्यात आली असून कालराला लवकरच मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले जाणार आहे.
शुबमन गिलसोबत जिंकला होता वर्ल्ड कप –
Former India U-19 World Cup winner Manjot Kalra arrested in Sri Lanka
D: https://t.co/HxUyvM6Vig pic.twitter.com/iiIomyXj1t
— NewsWire 🇱🇰 (@NewsWireLK) July 17, 2026
दिल्लीचा क्रिकेटपटू मनजोत कालरा हा २०१८ मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वात अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा मुख्य हिरो होता. या संघात शुबमन गिलही होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात कालराने शानदार शतक ठोकून भारताला चॅम्पियन बनवले होते. मात्र, २०१९ मध्ये तो ‘वय चोरी’ (Age Fraud) प्रकरणात अडकला. यानंतर २०२० मध्ये दिल्ली क्रिकेटने त्याच्यावर बंदी घातली होती. बंदी उठल्यानंतरही तो व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतला नाही. मे २०२६ मध्येच त्याने जाफना किंग्स फ्रँचायझीमध्ये भागीदारी खरेदी करत सह-मालक म्हणून नवी इनिंग सुरू केली होती, जी आता वादात सापडली आहे.





