Matthew Short Injured : सीएसकेला लागलं ग्रहण? एलिसनंतर आता ‘हा’ मॅचविनरही जखमी; IPL 2026 पूर्वीच चेन्नईच्या गोटात वाढली धाकधूक
Matthew Short Injured : वेगवान गोलंदाज नाथन एलिस स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, आता आणखी एका अष्टपैलू खेळाडूच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

CSK Allrounder Matthew Short Injured ahead IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. मात्र, स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला एकामागून एक धक्के बसत आहेत. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नाथन एलिस दुखापतीमुळे आधीच बाहेर पडला असताना, आता एक अष्टपैलू खेळाडू देखील अंगठ्याच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याचे समोर आले आहे.
अंगठ्याच्या दुखापतीमुळे मॅथ्यू शॉर्ट त्रस्त –
‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, अष्टपैलू खेळाडू मॅथ्यू शॉर्टला एका घरगुती स्पर्धेत खेळताना अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अजूनही पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे तो चेन्नई सुपर किंग्ससाठी सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये उपलब्ध नसेल. मॅथ्यू शॉर्ट हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि गरजेच्या वेळी तो ऑफ-स्पिन गोलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो. त्याच्या अनुपस्थितीमुळे चेन्नईच्या फलंदाजीच्या पर्यायांवर परिणाम होऊ शकतो.
१.५ कोटींत केल होते खरेदी –
🚨 ANOTHER INJURY IN CSK SQUAD 🚨
Austrelian star All-rounder Matthew Short is likely to miss the first few games of IPL 2026 due to a thumb fracture. pic.twitter.com/1KVduWgSdV
— Jordan cox (@vivek_sing7845) March 20, 2026
आयपीएल २०२६ च्या लिलावात चेन्नईने मॅथ्यू शॉर्टला त्याच्या १.५ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत (Base Price) खरेदी केले होते. यापूर्वी त्याने २०२३ मध्ये पंजाब किंग्ससाठी ६ सामने खेळले होते. शॉर्ट व्यतिरिक्त अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू यंदाच्या हंगामात सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाहीत. यामध्ये पॅट कमिन्स (SRH), जॉश हेझलवूड (RCB) आणि मिचेल स्टार्क (DC) यांचा समावेश आहे, जे अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेले नाहीत.
३० मार्चला राजस्थानशी भिडणार –
चेन्नई सुपर किंग्स आपला पहिला सामना ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुवाहाटी येथे खेळणार आहे. त्यानंतर ३ एप्रिलला पंजाब किंग्स, ५ एप्रिलला आरसीबी आणि ११ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सशी त्यांचा सामना होईल. मुख्य खेळाडूंच्या दुखापतींमुळे आता ऋतुराज गायकवाड आणि संघ व्यवस्थापनाला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागणार आहेत.





