माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात दोषी, शिक्षेचा निर्णय कधी होणार?

Australian Former cricketer Stuart Macgill drug deal case : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज स्टुअर्ट मॅकगिलच्या अडचणी वाढल्या आहेत. तो ड्रग्ज पुरवठ्यात सहभागी असल्याचा दोषी आढळला आहे. आता याची शिक्षा ८ आठवड्यांनंतर सुनावण्यात येईल. मॅकगिलने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाच्या अनेक महत्त्वाच्या विजयांमध्ये संघाचा भाग राहिला आहे. तो दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नसोबतही खेळला आहे. आता त्याची सुवर्ण कारकीर्द कलंकित झाली आहे.
काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज स्टुअर्ट मॅकगिल कोकेन तस्करीत सहभागी असल्याच्या आरोपात दोषी आढळला आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठ्यात सहभागी असल्याबद्दल त्याला क्लीन चिट देण्यात आली आहे. ५४ वर्षीय माजी लेग-स्पिनरला एप्रिल २०२१ मध्ये ३३०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स किमतीच्या एक किलो कोकेन व्यवहारात सहभागी असल्याच्या आरोपातून सिडनी जिल्हा न्यायालयाच्या ज्युरीने निर्दोष मुक्त केले आहे. परंतु, तो ड्रग्ज पुरवठ्यात सहभागी असल्याचा दोषी आढळला आहे. कोर्टाला सांगण्यात आले की मॅकगिलने त्याच्या नियमित ड्रग डीलरची ओळख त्याच्या जवळच्या नातेवाईक मारिनोस सोटिरोपौलोसशी सिडनी येथील त्याच्या रेस्टॉरंटमध्ये करून दिली होती.
Stuart MacGill has been acquitted of taking part in a large commercial drug supply in April 2021.
A Sydney District Court jury today said the former Australian Test cricketer knew he was taking part in a cocaine deal but was oblivious about the large scale of the exchange that… pic.twitter.com/PR0JPE8hrC
— 9News Australia (@9NewsAUS) March 13, 2025
सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला?
यावर मॅकगिल म्हणाला की त्यासा कोकेन व्यवहाराची कोणतीही माहिती नव्हती, परंतु सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्यांच्या सहभागाशिवाय हा व्यवहार शक्य झाला नसता. यापूर्वी स्टुअर्ट मॅकगिल एका विचित्र अपहरण प्रकरणामुळे चर्चेत आला होता. त्याने आपले अपहरण झाल्याचा दावा केला होता, तर दोन्ही अपहरणकर्त्यांनी सांगितले की मॅकगिल स्वतःच्या इच्छेने त्यांच्यासोबत गेला होता. या प्रकरणात ड्रग्ज तस्करीचाही उल्लेख होता.
स्टुअर्ट मॅकगिलचा जन्म १९७१ मध्ये झाला आणि त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळले आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने ४४ कसोटी सामने खेळले असून ८५ डावांमध्ये २०८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर फलंदाजी करताना ३४९ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ३ एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्स घेतल्या आहेत.





