विदेशी महिलेने तिरंग्यावर मागितली सही ! त्यानंतर नीरज चोप्राने केलेल्या ‘या’ कृतीच होतय कौतुक

नवी दिल्ली – जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने तिरंग्याचा मान राखत सर्वांची मने जिंकली आहेत. बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने 88.17 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. असे करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर नीरजने तिरंग्यासोबत फोटोसाठी पोज दिली. मात्र त्यानंतर घडलेल्या एका प्रकारामुळे नीरज चांगलाच चर्चेत आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुवर्णपदक जिंकल्यानंतर हंगेरियन महिला फॅनने नीरज चोप्राचे कौतुक करत त्याला ऑटोग्राफ मागितला. नीरजने लगेच होकार दिला, पण जेव्हा महिला चाहतीने ऑटोग्राफसाठी तिरंगा पुढे केला तेव्हा नीरजने भारतीय ध्वजावर सही करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने महिलेच्या हातावरील टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला. नीरजच्या तिरंग्याबद्दलच्या या आदराने सर्वांची मनं जिंकली.
यापूर्वीही तिरंग्याचा केला होता सन्मान
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंप्रमाणे नीरजनेही तिरंगा फडकावत आनंद साजरा केला. मात्र, सेलिब्रेशन केल्यानंतर बहुतांश खेळाडू आपल्या देशाचा ध्वज जमिनीवर फेकतात किंवा खुर्चीवर ठेवतात, पण नीरजने तसे केले नाही. उत्सवानंतर त्यांनी तिरंगा दुमडून पूर्ण आदराने आपल्या बॅगेत ठेवला. या घटनेनंतरही त्यांचे खूप कौतुक झाले होते.
A Hungarian woman asked for Neeraj Chopra’s autograph on an Indian flag, Neeraj refused and said ‘I can’t sign a flag’. He later signed the woman’s t-shirt sleeve. (Sportstar).
Neeraj’s respect and admiration for the flag of India is admirable ! 🇮🇳#NeerajChopra #GOLD #Golden… pic.twitter.com/hQp88QJ82l
— Sara Tendulkar FC (@saratendulkerr) August 28, 2023
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. राष्ट्रकुल चॅम्पियन अर्शद नदीमने 87.82 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदक जिंकले, तर झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजने 86.67 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले.





