पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकत रचणार ‘हा’ विक्रम

नवी दिल्ली : देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. आपण यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाते. देशभक्तीची भावना आणि देशाप्रतीचे आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमपासून परेडपर्यंत अनेक गोष्टींचे आयोजन केले जाते. या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्यावरून ध्वजारोहण करतात व देशवासीयांना संबोधित करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रचणार ‘हा’ विक्रम
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सलग 10 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता. यंदाच्या 15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकत पीएम नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर विक्रम रचतील. लालकिल्ल्यावर सर्वाधिक तिरंगा फडकावण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. नेहरू यांनी 17 वेळा लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं होतं. तर इंदिरा गांधी यांच्या नावावर 16 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1947 ते 1963 दरम्यान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. तर इंदिरा गांधी यांनी 1966 पासून 1976 पर्यंत आणि 1980 ते 1984 पर्यंत सलग पाच वेळा एकूण 16 वेळा लाल किल्यावरून ध्वजारोहण करत देशवासीयांना संबोधित केलं. तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी 2004 ते 2013 अशी सलग दहा वर्ष लालकिल्ल्यावर तिरंगा फडकावला.





