भोपाल – ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दाखवण्यासाठी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सिनेमागृहात एका 19 वर्षीय तरुणीला नेले होते. तिचे मतपरिवर्तन करण्यासाठी त्या मुलीला हा चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जाण्यात आले होते. मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच ही मुलगी प्रियकर युसूफसोबत पळून गेली आहे. त्यामुळे आता साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका केली जात आहे.
मध्यप्रदेशातील भोपाळच्या बसेरा परिसरात राहणाऱ्या मुलीचे यूसुफवर प्रेम होते. तो तिच्या घराच्या शेजारीच राहत होता. तिचे काही दिवसावर लग्न होणार होते. मात्र त्या आधीच घरातील पैसे आणि दागिने घेऊन ती यूसुफसोबत पळून गेली. याप्रकरणी मुलीच्या कुटूंबाने भोपाळच्या कमला नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
यात कुटूंबाने त्यांच्या मुलीला यूसुफने गोड बोलून तिला फरार केल्याचे म्हंटले आहे. याशिवाय यूसुफने या मुलीच्या नावे बँकेतून कर्ज घेऊन तिला EMI भरण्यास भाग पाडल्याचा आरोपही केला आहे. मात्र कुटुंबियांनी केलेले आरोप फेटाळून लावत माझ्या मर्जीने यूसुफ सोबत पळून गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
धक्कादायक म्हणजे यूसुफ अनेक गुन्हे दाखल आहेत. या संपूर्ण घटनेवर भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “आपल्या मुलींनी जागृक होण्याची गरज आहे. आपल्या लहान मुली ज्या निरागस आहेत, त्यांना सध्या लक्षात येत नाही. पण त्यांच जीवन सुरक्षित नाही. त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी मी खंबीरपणे पुढे येईल आणि येत राहिल. लव्ह जिहादच्या फंदात पडू नका आणि आईव-डिलांचा आदर करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा”, असे सल्ला त्यांनी मुलींना दिला. दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला मोठा विरोध झाला होता. मात्र तरी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.