अन्नाच्या उत्पादन पाकिटांचा गोलमाल चव्हाट्यावर.! १३ जूनचं दही १२ तारखेलाच आलं विक्रीला

Shimla – बाजारात आपण घेत असलेल्या अन्नाच्या पाकिटांवर जी उत्पादनाची तारीख टाकली जाते, त्यामधील गोलमाल आता पुन्हा एकदा समोर आला आहे. बिलासपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित दुग्ध कंपनी व्यासधेनूच्या दह्याच्या पॅकेटवर दुसऱ्या दिवसाची उत्पादन तारीख नमूद करण्यात आल्याने लोक आश्चर्यचकित झाले.
१२ जून रोजी बाजारात पोहोचलेल्या दहीच्या पॅकेटवर उत्पादन तारीख चक्क १३ जून होती. म्हणजेच, दही तयार करण्याच्या दिवसाच्या एक दिवस आधी बाजारात पोहोचले. ग्राहकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनेक ग्राहकांनी दुकानदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबद्दल तक्रार केली.
लोकांनी सांगितले की, त्यांनी १२ तारखेला खरेदी केलेल्या दह्याच्या पॅकेटकडे पाहिले तेव्हा त्यावर १३ जूनची उत्पादन तारीख नमूद करण्यात आली होती. कंपनीचा हा निष्काळजीपणा केवळ ग्राहकांच्या भावनांशी खेळत नाही तर अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांचे घोर उल्लंघन करतो आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि या गंभीर निष्काळजीपणाबद्दल कंपनीला जाब विचारावा. या कंपनीवर आवश्यक कायदेशीर कारवाई करावी. अशा घटना रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, कारण हे प्रकरण ग्राहकांच्या हक्कांबद्दल देखील आहे.





