Kumar Sanu : “एकत्र विमानप्रवास, रंगलेल्या गप्पा आणि..”; अटलजींबद्दल कुमार सानू भरभरून बोलले
Kumar Sanu : अशीच एक आठवण त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्याविषयीची सांगितली.

Kumar Sanu : संगीत क्षेत्राला एक वेगळी कलाटणी प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्यामुळे मिळाली. ९० च्या दशकात आशिकी चित्रपट आला आणि कुमार सानू हे नाव लोकप्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी गायलेले प्रत्येक गाणं हिट ठरले. आजही त्यांची प्रत्येक गाणी श्रोते आवडीने ऐकतात.
कुमार सानू तसे मूळचे पश्चिम बंगाल राज्यातील कलकत्ता येथले. वडील गायक असल्याने त्यांना घरातच गायनाचे धडे मिळाले. त्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या दिवसांमध्ये कलकत्ता येथील हॅाटेलमध्ये गायन करून आपला उदरनिर्वाह केला. पुढे मुंबईत आले आणि मुंबईकर झाले; पण यासाठी मोठा संघर्षाचा सामाना त्यांना करावा लागला. हॅाटेलमधील शोसाठी पहिली टीप त्यांना तब्बल चार हजार रुपयांची मिळाली होती.
आज कुमार सानू हे नाव एका वेगळ्या उंचीवर आहे. नुकतीच त्यांची एका न्यूज चॅनेललने मुलाखत घेतली असून, या मुलाखतीमधून त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. अशीच एक आठवण त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्याविषयीची सांगितली.
भाजपच्या कॅपेनिंगसाठी कुमार सानू यांनी अनेकदा अटबिहारी वाजपेयी यांच्यासोबत एकत्र विमान प्रवास केला. कलकत्ता, आसाम यांसाह विविध ठिकाणी ते गेले. विमान प्रवासात सानू यांच्या अटलजींसोबत गप्पा रंगायच्या. त्यांच्याकडून त्यांनी एक महत्वाची गोष्ट आत्मसात केली. त्याविषयी बोलताना कुमार सानू म्हणाले “अटल बिहारी वाजपेयी मला कंपेनिंगसाठी घेऊन जायचे. त्यांच्यासोबत विमानाने प्रवास केला. कलकत्ता आसाम आणि तीन चार ठिकाणी फिरलो. त्यांच्याकडून मी एक गोष्ट शिकलो की गरिबी हा क्रायटेरिया नाही; सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे ते म्हणजे शिक्षण. हे जर होत असेल तर आपण त्याद्वारे गरिबी मिटवू शकतो. ही त्यांची विचारसरणी होती.”
ते म्हणाले, “मी २०० शाळा तयार करण्यासाठी तयारी करत आहे. मुस्लिम समुदायासाठी ही शाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला त्यांच्या या विचारातून प्रोत्साहन मिळाले.” खरंतर कुमार सानू यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. पण अचानक त्यांनी नापसंती दर्शवली आणि पुन्हा २०१४ मध्ये भाजपमध्ये आले. त्यावेळी अमित शाह यांच्यासोबतचा त्यांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याविषयी सांगताना कुमार सानू म्हणतात, “मी भाजपात गेलो होतो. माझे स्वतःचे काम खूप जास्त होते. पार्टीसाठी देखील वेळ द्यावा लागतो. पण ते काही जमलं नाही. राजकारणात जायचं असेल तर पूर्ण राजकारण करावं लागतं, असेही ते म्हणाले. सध्या कुमार सानू त्यांच्या यू ट्यूब चॅनेललच्या माध्यमातून चाहत्यांसोबत कनेक्ट राहत असतात.






