Discount On iPhone 16 Series: प्रजासत्ताक दिनाच्याआधी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Monumental sale 2025 ची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये अनेक ब्रँडेड स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत. खासकरून, iPhones ला या सेलमधून खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध असलेल्या आयफोनवरील ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये iPhone 16 सीरिजवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. आयफोन 16 सीरिजचे बेस मॉडेल 79,900 रुपये किंमतीत लाँच झाले होते. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये आयफोन 16 ला 63,999 रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर iPhone 16 Plus मॉडेलला 89,900 रुपयांऐवजी 73,999 रुपयात खरेदी करू शकता.
iPhone 16 Pro स्मार्टफोनवरील ऑफर्सबद्दल सांगायचे तर या फोनला 1,19,900 रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र, सेलमध्ये हा फोन 1,02,900 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तर iPhone 16 Pro Max ला 1,44,900 रुपयांऐवजी 1,27,900 रुपयात खरेदी करता येईल.
आयफोन 16 च्या 128 जीबी स्टोरेज मॉडेलची सेलमध्ये किंमत 69,999 रुपयांपासून सुरू होते. या फोनवर 6,901 रुपये फ्लॅट डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, खरेदी करताना एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर केल्यास 4 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. याशिवाय, 2 हजार रुपये अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. सर्व डिस्काउंटचा फायदा मिळाल्यास फोनला फक्त 63,999 रुपये किंमतीत खरेदी करता येईल.
iPhone 15, iPhone 14, iPhone 13 वर डिस्काउंट
सेलमध्ये आयफोन 15 ची सुरुवाती किंमत 55,999 रुपये आहे. आयफोन 15 प्लसला 59,999 रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. तर आयफोन 14 आणि आयफोन 13 ला अनुक्रमे 46,999 रुपये आणि 39,999 रुपये किंमतीत खरेदी करता येईल. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यावरच या किंमतीत फोनला खरेदी करू शकता. दरम्यान, 19 जानेवारीपर्यंत फ्लिपकार्टचा हा सेल सुरू होईल.