नववर्षात स्वस्तात घरी घेऊन जा iPhone 15, 20 हजारांची मिळतेय बंपर सूट; पाहा डिटेल्स

iPhone 15 Discount Offers: नववर्षाच्या निमित्ताने iPhone 15 ला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर हा फोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फ्लॅगशिप फोनला तुम्ही 25 हजार रुपयांच्या बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. आयफोन 15 वरील या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
iPhone 15 वर बंपर डिस्काउंट
iPhone 15 च्या 128GB काळ्या रंगात येणाऱ्या मॉडेलची किंमत आधी 69,900 रुपये होते. मात्र, आता हा फोन फ्लिपकार्टवर 15 टक्के डिस्काउंटसह 59,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा फायदा मिळाल्यास फोनची किंमत अजूनच कमी होते.
या फोनला खरेदी करताना आयफोन 14 एक्सचेंज केल्यास 8 हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळेल. अशाप्रकारे फोन फक्त 51,999 रुपये किंमतीत उपलब्ध होईल. मात्र लक्षात घ्या की एक्सचेंज ऑफर तुम्ही कोणता फोन एक्सचेंज करता, यावर अवलंबून आहे.
तसेच, एचडीएफसी बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास अतिरिक्त 1 हजार रुपये डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे फोनला आयफोनला फक्त 50,999 रुपयात खरेदी करू शकता.
iPhone 15 चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 15 मध्ये 6.1 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. फोन A16 बायोनिक चिपसह येतो. फोनमध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच, क्वाड पिक्सल सेंसर देखील मिळेल. तर सेल्फीसाठी 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही शानदार फोटो काढू शकता. फोनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत.





