iPhone 15 व 15 प्लसवर बक्कळ डिस्काउंट! सेलमध्ये किंमत फक्त….

जर तुम्ही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला एका अशा ऑफरबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला आयफोनवर घसघशीत सूट मिळणार आहे.
फ्लिपकार्टवर सध्या ब्लॅक फ्रायडे सेल सुरू असून तो २४ नोव्हेंबरपासून २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये Apple iPhone 15 Series वर मोठी सूट देण्यात येत आहे. यामुळे तुम्ही आयफोन स्वस्तात खरेदी करू शकता.
iPhone 15 वर नेमकी ऑफर काय?
Apple iPhone 15 ची ऑनलाईन व ऑफलाईन किंमत सहसा ₹69,900 हजारांच्या आसपास असते. या सेलमध्ये ₹11,651 ची सूट देण्यात येत असून यामुळे तुम्हाला हा फोन ₹58,249 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
iPhone 15 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो (2556×1179 पिक्सल) रिझोल्यूशनसह येतो. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2000 निट्स आहे.
या आयफोनमध्ये Ceramic Shield प्रोटेक्शन मिळतं, ज्यामुळे डिव्हाइस अधिक मजबूत बनतं. Dynamic Island नोटिफिकेशन सिस्टीम ही या फोनची खासियत आहे.
iPhone 15 मध्ये A16 Bionic चिपसेट, 48MP प्रायमरी कॅमेरा, डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्ससाठी IP68 रेटिंग, ड्युअल स्पीकर्स आणि यूएसबी टाइप-C चार्जिंग सपोर्ट आहे.
iPhone 15 Plus वर देखील ऑफर
जर तुम्हाला मोठा स्क्रीन असलेला फोन हवा असेल, तर iPhone 15 Plus हा एक चांगला पर्याय आहे. ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये हा फोन ₹65,499 मध्ये उपलब्ध आहे. सामान्यतः ₹79,900 किमतीच्या या फोनवर ₹14,401 ची सूट आहे.
iPhone 15 Plus मध्ये iPhone 15 सारखंच हार्डवेअर आणि फीचर्स आहेत, परंतु यामध्ये मोठा डिस्प्ले मिळतो. मोठ्या स्क्रीनचा अनुभव घ्यायचा असल्यास हा फोन परफेक्ट आहे.
iPhone 15 की 16 कोणता फोन घ्यावा?
iPhone 16 मध्ये AI आधारित फीचर्स आणि अॅडव्हान्स Siri सपोर्ट आहे. iPhone 15 आणि iPhone 15 मध्ये हे फीचर्स नसले तरी देखील हे दोन्ही फोन एक चांगला पर्याय ठरू शकतात. विशेषतः ऑफरमध्ये देण्यात आलेल्या डिस्काउंटमुळे हा फोन व्हॅल्यू फॉर मनी ठरतोय.





