Flipkart Big Billion Days 2026 : शॉपिंगसाठी बजेट तयार ठेवा.! ‘Flipkart’च्या Big Billion Days Sale ची तारीख जाहीर; ‘या’ वस्तू होणार स्वस्त, वाचा संपूर्ण लिस्ट
यंदाही मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टवॉच, टीव्ही, हेडफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर विविध प्रकारच्या ऑफर्सची घोषणा करण्यात आली आहे.

Big Billion Days 2026 : गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच आता नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे? लॅपटॉप अपग्रेड करायचा आहे? टीव्ही, स्मार्टवॉच किंवा घरातील एखादं मोठं इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करण्याचा विचार आहे? मग आत्तापासूनच तुमचं बजेट आणि विशलिस्ट तयार ठेवणं फायदेशीर ठरू शकतं.
कारण देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Flipkartचा बहुचर्चित Big Billion Days 2026 सेल आता अधिकृतपणे जाहीर झाला आहे.
Flipkartने जाहीर केलेल्या माहितीनुसार, यंदाचा Big Billion Days सेल ९ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व ग्राहकांसाठी सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच ग्राहकांना ऑफर्सचा अंदाज घेता यावा यासाठी Early Bird Deals २४ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहेत.
त्याशिवाय Flipkart Plus, Flipkart Black सदस्य आणि पात्र Flipkart Credit Card धारकांना ८ ऑक्टोबरपासून Early Access मिळणार आहे. म्हणजेच सामान्य ग्राहकांपेक्षा काही ग्राहकांना तब्बल एक दिवस आधी शॉपिंगची संधी मिळणार आहे.
स्मार्टफोन खरेदीदारांसाठी मोठी उत्सुकता
Big Billion Days म्हटलं की सर्वाधिक चर्चा होते ती स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सवरील ऑफर्सची. यंदाही मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टवॉच, टीव्ही, हेडफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर विविध प्रकारच्या ऑफर्सची घोषणा करण्यात आली आहे.
Flipkartच्या अधिकृत सेल पेजवर Apple, Samsung, Motorola, Google, Nothing यांसारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सचा समावेश असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
त्यामुळे iPhone किंवा Samsung Galaxy फोन खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांचं या सेलवर विशेष लक्ष असणार आहे. मात्र विशिष्ट iPhone किंवा Samsung Galaxy मॉडेलवर नेमकी किती किंमत कमी होणार, याचा संपूर्ण तपशील अद्याप जाहीर झालेला नाही.
बँक कार्डवर १० टक्क्यांपर्यंत बचत
सेलमध्ये फक्त उत्पादनाची किंमत कमी होणार एवढंच नाही, तर पेमेंट ऑफर्समधूनही बचत करण्याची संधी मिळणार आहे. Flipkartच्या माहितीनुसार, पात्र Axis Bank आणि ICICI Bank कार्डवर १० टक्क्यांपर्यंत Instant Discount मिळू शकतो. याशिवाय Flipkart Axis Bank Credit Cardच्या माध्यमातूनही बचतीचा लाभ उपलब्ध असेल.
फक्त मोबाइलच नाही, लॅपटॉपपासून टीव्हीपर्यंत ऑफर्स
Big Billion Days 2026 मध्ये स्मार्टफोन्ससोबतच लॅपटॉप, स्मार्टवॉच, TWS इअरबड्स, गेमिंग कन्सोल, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, किचन अप्लायन्सेस, फॅशन, ब्युटी आणि होम फर्निचर अशा विविध श्रेणींमध्ये ऑफर्स उपलब्ध होणार आहेत.
Flipkartने यंदाच्या सेलसाठी Price Crash, BBD Specials, Tick Tock Deals, Brand Hours, Double Discount आणि Rush Hours यांसारख्या विविध डील फॉरमॅट्सचीही माहिती दिली आहे. त्यामुळे काही ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी किंवा ठरावीक वेळेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
iPhone आणि Samsung Galaxyवर काय मिळणार?
सध्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक उत्सुकता iPhone आणि Samsung Galaxy स्मार्टफोन्सच्या किंमतींबाबत आहे. Flipkartने Early Bird previewमध्ये iPhone 17 आणि Samsung Galaxy S25 यांसारख्या मॉडेल्सचा उल्लेख केला आहे.
त्यामुळे या फोनच्या खरेदीसाठी सेलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम विक्री किंमत, एक्सचेंज बोनस, EMI किंवा अतिरिक्त बँक ऑफर उत्पादनानुसार वेगळी असू शकते.
त्यामुळे एखादा फोन खरेदी करण्यापूर्वी फक्त ‘डिस्काउंट’ पाहण्याऐवजी सध्याची बाजारातील किंमत, Flipkartवरील सेल किंमत, बँक ऑफर, एक्सचेंज व्हॅल्यू आणि EMIचा एकत्रित फायदा तपासणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.






