मुदत ठेव की म्युच्युअल फंडांच्या योजना? (भाग-2)

मुदत ठेव की म्युच्युअल फंडांच्या योजना? (भाग-1)

वेगाने विकास करणाऱ्या आपल्या देशात येणाऱ्या काळात सातत्याने व्याजदर निश्चितच कमी होत जाणार आहे. कारण कमी व्याजदर देशाच्या प्रगतीला पूरक असतात. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश अशा विकसित राष्ट्रांमध्ये ठेवींवरील व्याजदर केवळ १ ते २ टक्केच असते. भारतही पुढील सात-आठ वर्षात विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. म्हणजेच गुंतवणूकादारांना ठेवींवरील गुंतवणुकीवर मोठे व्याजदर मिळण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे. या गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकत नाही.

सुरक्षितरित्या व्याजदर जास्त कमावायाचा असेल गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजनांता विचार करावयास हवा. या गुंतवणूक पर्यायांमध्येही निश्चित जोखिम असते. परंतु अत्यंत कुशल व्यवस्थापन, पारदर्शकता व बाजार परिस्थितीनुसार वेळोवेळी केले जाणारे बदल गुंतवणूकदारांना बचतठेवींपेक्षा जास्त परतावा देऊन जात आहेत. प्रत्येक गुंतवणूकदाराची जोखिम घेण्याची क्षमता वेगवेवेळी असते. कारण प्रत्येकाचे उत्पन्न, गरजा वेगळ्या असतात. आर्थिक उद्दीष्टेही वेगळी असतात. दैनंदिन खर्च, मासिक उत्पन्न व भविष्यातील स्वप्ने प्रत्येक गुंतवणूकदाराप्रमाणे बदलतात. आपल्या जोखिम घेण्याच्या क्षमतेनुसार उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीतील वेळेनुसार प्रत्येक गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडातील योजनांची निवड करणे फायदेशीर ठरते. यासाठी आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घेणे व योग्य सल्ल्यानेच पैस गुंतवणे भविष्यासाठी योग्य ठरेल

बँकांमधील मुदतठेवी व म्युच्युअल फंडांची योजना यांची तुलना करताना नोकरी व व्यवसायातील तुलनेप्रमाणे करता येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीस नियमित ठराविक उत्पन्न पगाराद्वारे मिळत असते. परंतु व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस मात्र त्याच्या मेहनतीप्रमाणे व व्यवसायातील संधींप्रमाणे दरमहा वेगवेगळा नफा कमावता येतो. नोकरीतील पगारास व बचत ठेवींतील उत्पन्नात फारसे मोठे बदल होत नाहीत.म्युच्युअल फंडातील परताव्याला सातत्य नसते आणि त्यामध्ये कायम बदल होत असतो. व्यवसाय व म्युच्युअल फंड योजनांमध्ये जोखिम जास्त असते. परंतु त्यामुळे परतावाही जास्त मिळण्याची शक्यता वाढते. तशी शक्यता मुदत ठेवींमध्ये मुळीच नसते.

मुदत ठेवींमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये सहकारी बँका व खासगी संस्था यामध्ये मोठी जोखिम निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ रूपी सहकारी बँक, शिवाजीराव भोसले सहकारी बँक, आयएलअँड एफएस, झी एन्टरप्रायजेस, दिवाण हौसिंग इत्यादी अनेक वित्तीय संस्था आणि बँका अडचणीत आलेल्या आहेत. ठेवींमधील जोखिम वाढत आहे. परंतु परतावा वाढण्याची शक्यता जवळपास नाही अशी स्थिती आहे. किंबहुना मुद्दलही जाण्याची जोखिम वाढत आहे.

मुदत ठेवींवरील व्याजाचा गुंतवणूकदाराच्या मूळ उत्पन्नात समावेश होत असल्याने या व्याजदरावर भरावा लागणाऱ्या प्राप्तीकराचे प्रमाणही जास्त आहे. परंतु म्युच्युअल फंडातील डेट योजनांवरील नफ्यावर प्राप्तीकर कमी आकारला जातो. जर गुंतवणूकदाराकडे पाच वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी असेल तर म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांचाही निश्चित विचार करावयास हवा. या योजना गुंतवणुकीसाठी आकर्षक व सुलभ पर्याय ठरू शकतात. पारदर्शकता, तरलता, कुशल व्यवस्थापन, आकर्षक परतावा असे अनेक फायदे म्युच्युअल फंडातील योजनांमधून गुंतवणूकदारास मिळत आहेत. हे फायदे आपणांस मुदतठेवी किवा बचत ठेवींमध्ये मिळू शकणार नाहीत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.