Manipur News : मणिपूरमध्ये पाच अतिरेक्यांना अटक
Updated On:

इंफाळ – मणिपूरच्या चुराचंदपूर आणि इंफाळ पूर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या कारवाईत तीन अल्पवयीन मुलांसह पाच अतिरेक्यांना अटक करण्यात आलीआहे. हे सर्वजण प्रतिबंधित युनायटेड कुकी नॅशनल आर्मी (यूकेएनए) चे कार्यकर्ते होते, अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिली.
त्यांच्यावर खंडणी, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा आरोप असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मणिपूरच्या तीन जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांसमोर लोकांनी १६ वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका आणि विविध दारूगोळा जमा केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





