‘पंचायत 3’ च्या सेटवरील सचिवजी चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

Amazon – जर आपण प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Amazon प्राइम व्हिडिओच्या सर्वात प्रसिद्ध वेब सीरिजबद्दल बोललो, तर दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांच्या सुपरहिट वेब सीरिज पंचायत 3 चे नाव त्यात नक्कीच समाविष्ट केले जाईल. पहिल्या दोन सीझनच्या प्रचंड यशानंतर आता निर्माते तिसरा भाग म्हणजेच पंचायत 3 घेऊन येत आहे. दरम्यान, जितेंद्र कुमार अभिनीत या मालिकेचे लेटेस्ट फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
प्राइम व्हिडिओच्या पंचायत वेब सीरिजच्या पहिल्या दोन सीझनने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. या मालिकेला रसिकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. वेब सीरिजची कथा आणि स्टारकास्टने इतकं अप्रतिम काम केलंय की सगळ्यांचीच पंचाईत झाली आहे. दरम्यान, पंचायत 3 संदर्भात एक मोठे अपडेट समोर आली आहे.
मालिकेच्या निर्मात्यांनी पंचायत सीझन 3 चे नवीनतम पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये वेब सीरिजचा अभिनेता जितेंद्र कुमार म्हणजेच सचिवजी खांद्यावर बॅग घेऊन बाईकवर जाताना दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये पंचायत 2 चे पात्र भूषण म्हणजेच बनरकस (दुर्गेश कुमार), विनोद (अशोक पाठक) आणि प्रल्हाद (फैसल मलिक) एकत्र दिसत आहेत.
या पोस्टर्सच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे,’आम्हाला चांगले माहित आहे की प्रतीक्षा करणे खूप असह्य आहे. याच कारणासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास सेट घेऊन आलो आहोत. या कॅप्शनसह पंचायत सीझन 3 देखील नमूद केला आहे. अशा स्थितीत आता ही मालिका काही काळानंतर फ्लोअरवर जाईल असे स्पष्टपणे सांगता येते.
पंचायत वेब सिरीजचा पहिला भाग 2020 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर, या मालिकेचा दुसरा भाग 2022 मध्ये परत आला आणि चाहत्यांना तो सीझन खूप आवडला. अशात आता चाहत्यांना पंचायत 3 च्या रिलीजची उत्सुकता लागली आहे. असे मानले जात आहे की पंचायत सीझन 3 पुढील वर्षी 2024 मध्ये Amazon प्राइम व्हिडिओवर रिलीज होऊ शकतो.





