नायगाव -येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयाने तालुकास्तरीय आंतरशालेय नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. न्यू इंग्लिश स्कूल गुरोळी (ता. पुरंदर) येथे पुरंदर तालुका आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरंदर तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेत मोठ्या गटात श्री सिद्धेश्वर विद्यालय नायगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी बसविलेल्या अपराध के किडे या नाट्याचा पुरंदर तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे. या नाट्यस्पर्धेमध्ये विद्यालयातील आर्यवीर खळदकर, अथर्व चौंडकर, चेतन शेंडगे, सुरज कड आदी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक कमलाकर कापडणे, मुख्याध्यापिका लता बोकड व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश उरसळ, कार्याध्यक्ष अजित निगडे, संचालक सुहास खेसे आदींनी अभिनंदन केले.