Pune News : देवगड हापूस आंब्याची बाजारात आवक; बाजारपेठेत घाऊक विक्री उत्साहात
Pune News : फळांचा राजा आणि कोकणची शान मानल्या जाणाऱ्या अस्सल ‘देवगड हापूस’ आंब्याची मार्केट यार्डातील फळ बाजारात पहिली आवक झाली आहे.

Pune News : कोकणची शान आणि राजा मानल्या जाणाऱ्या ‘देवगड हापूस’ आंब्याची मार्केटयार्ड येथील बाजारात आवक झाली आहे. मे.शेखर तात्याबा कुंजीर या फळाच्या गाळ्यावर ७ डझन आंब्याची आवक झाली. (Pune News)
देवगड येथील प्रगतशील शेतकरी ओमप्रकाश घाडी यांच्या देवगड येथील बागेतील हापूस आंब्याला बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या व्यवहारात आंब्याची उत्तम खरेदी-विक्री झाली. (Pune News)
या व्यवहारादरम्यान शेतकरी ओमकार प्रकाश घाडी यांच्या ५ डझनच्या एका क्रेटला १५ हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळाला असून व्यापारी युवराज काची यांनी या पेटीची खरेदी केली. १४ नग क्रेटसाठी २१०० रुपये दर मिळाला असून ग्राहक राजू भोळे यांनी खरेदी केली. (Pune News)
यावेळी शेखर तात्याबा कुंजीर पेढीचे व्यापारी सिद्धार्थ कुंजीर, रोहन जाधव, संतोष कुंभारकर, युवराज काची, दीपक कानडे, उमंग पंजाबी, शरद कुंजीर, राहुल भोसले, अनिकेत तावरे, रणवीर कुंजीर आणि गुलजार बागवान आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune News)
आगामी काळात हापूस आंब्याची आवक अधिक वाढणार असून, या हंगामात शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे उत्तम रिटर्न मिळतील, अशी आशा व्यापारी सिद्धार्थ कुंजीर यांनी यावेळी व्यक्त केली. (Pune News)





