Apache helicopters : अमेरिकेतून पहिली ३ अपाचे हेलिकॉप्टर भारतात दाखल

Apache helicopters – अमेरिकेतून आयात केलेल्या बहुचर्चित अपाचे हेलिकॉप्टर्सपैकी पहिली ३ हेलिकॉप्टर आज भारतात दाखल झाली. मोठा शस्त्रसाठा वाहून नेण्याच्या तसेच इतर अत्याधुनिक लष्करी क्षमतांमुळे त्यांना ‘आकाशातला रणगाडा’ या नावानेही संबोधण्यात येते. अमेरिकेकडून अशी एकूण २२ अपाचे हेलिकॉप्टर आयात करण्याचा निर्णय भारताने २०१५ साली घेतला होता.
भारतीय लष्कराला सहा हेलिकॉप्टर पुरवण्याच्या ४,१६८ कोटी रुपयांच्या करार करण्यात आला आहे. अपाचे हे जगातील सर्वात प्रगत बहु-उपयोगी लढाऊ हेलिकॉप्टरपैकी एक आहे आणि ते अमेरिकन सैन्यात सर्वाधिक वापरले जाते.
या हेलिकॉप्टरमुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेला मोठाच हातभार लागणार असून लष्करी उड्डाण विभागाला विविध प्रकारच्या भूप्रदेशात कार्यक्षम कर्तव्य बजावताना त्यांचा उपयोग होईल असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.





