Baramati News : बारामती एमआयडीसीत उद्योजकाच्या डिफेंडर कारवर गोळीबार; दोन लाखांच्या खंडणीची मागणी?
Baramati News : बारामती एमआयडीसी परिसरातील शिवांभोनगर येथे उद्योजक राजन कोळेकर यांच्या आलिशान डिफेंडर कारवर अज्ञात हल्लेखोरांनी दोन राउंड गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Baramati News : बारामती एमआयडीसी परिसरातील शिवांभोनगर येथे उद्योजक राजन कोळेकर यांच्या डिफेंडर कारवर अज्ञात हल्लेखोरांनी दोन राउंड गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. गोळीबाराच्या या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. (Baramati News)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवांभोनगर परिसरात राजन कोळेकर यांचे निवासस्थान आहे. शुक्रवारी दुपारी त्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला होता. यावेळी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराजवळ येऊन डिफेंडर कारवर दोन राउंड गोळीबार केला. (Baramati News)
अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. (Baramati News)
दरम्यान, गोळीबार करणारे अज्ञात हल्लेखोर कोण आहेत, त्यांनी खंडणीच्या उद्देशानेच हा प्रकार केला आहे का, तसेच या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह तांत्रिक माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. (Baramati News)
गोळीबारामागचे नेमके कारण काय?
इन्स्टाग्रामवरून खंडणीची मागणी आणि त्यानंतर काही तासांतच उद्योजकाच्या घराजवळ गोळीबार झाल्याने या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. पोलिस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. (Baramati News)
Baramati News : बारामती विमानतळाच्या विकासासाठी ६४.५३ कोटींचा निधी मंजूर





