Agniveer Yojana: अग्निवीरांना मिळणार सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण; सरकारची मोठी घोषणा

Agniveer Yojana – लष्कराच्या सेवेतील अग्निवीरांना राजस्थानमध्ये आरक्षण दिले जाणार आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत ही घोषणा केली. लष्करातील अग्निवीर योद्ध्यांना राजस्थान पोलिस, वनरक्षक आणि जेल गार्डच्या भरतीमध्ये आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, या संदर्भात सैनिक कल्याण विभागाने पाच राज्यांमध्ये 10 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला आहे. या भरतींमध्ये अग्निवीरांना किती टक्के आरक्षण मिळणार हेही लवकरच ठरवले जाईल. हे आरक्षण पाच ते दहा टक्क्यांपर्यंत असू शकते.
पाच राज्यांमध्ये 10 टक्के आरक्षण दिले आहे
कारगिल विजय दिवसानिमित्त पाच राज्यांच्या भाजप सरकारने नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. राजस्थान सोबतच उत्तर प्रदेशातील पोलीस सेवेत आणि पीएसी,
मध्य प्रदेशातील पोलीस आणि सशस्त्र दल, छत्तीसगडमध्ये पोलीस आणि वनरक्षक भरती, ओडिशातील पोलीस भरती आणि उत्तराखंडमधील सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण दिले जाईल.





