Pune : अग्निशमन दलाकडून नदीमध्ये अडकलेल्या 19 वर्षीय तरुणाला जीवदान

Pune News | आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दल नियंत्रण कक्षात एक तरुण मुंढवा पुलाखाली नदीमध्ये मधोमध अडकला असून मदतीची मागणी करत असल्याचा फोन आला. यानंतर तातडीने अग्निशमल दलातील वाहन बी.टी. कवडे रस्ता येथे रवाना करण्यात आले. नदीच्या मधोमध एक तरुण पाण्यात अडकला असून तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत असल्याचे दलातील कर्मचाऱ्यांना दिसले. त्याला अग्निशमल दलातील जवानांनी रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याच्या साह्याने पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. हा तरुण १९ वर्षांचा असून तो नेमका तिथे कसा गेला याची माहिती मिळू शकलेली नाही.
घटनास्थळी अग्निशमल दलातील कर्मचारी पोहोचताच जवानांनी पाहिले की, नदीच्या मधोमध एक तरुण पाण्यात अडकला असून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी जवानांनी तातडीने रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग याच्या साह्याने पाण्यात उतरत त्या तरुणाजवळ जाऊन त्याला धीर देत त्याच्याशी संवाद साधत, त्याला अवघ्या पंधरा मिनिटातच पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर तिथे उपस्थित त्याच्या आई वडिलांकडे त्याला स्वाधीन केले. या कामगिरीत वाहनचालक निलेश भोसले, तांडेल अंबादास दराडे व फायरमन संदिप जगताप, सतिश पोटघन, कुणाल यांनी बचावकार्य पार पाडत तरुणाचा जीव वाचवला.





