Coolie Box Office : फायर नही वाइल्ड फायर! बॅाक्स अॅाफिसवर कुलीचा धुव्वा; पाहा दोन दिवसांचे कलेक्शन…

Coolie Box Office : गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या कुली सिनेमाची जोरदार चर्चा होती. अखेर स्वातंत्रदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ अॅागस्टला कुली देशभरात रिलीज करण्यात आला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी कुलीने बॅाक्स अॅाफिसवर धुव्वा केला आहे. खरंतर रिलीज होण्याअगोदर तिकिट बुकिंमध्येच कुलीने १०० कोटींचा सेल केला. आता हा सिनेमा पाहिल्यानंतर रजनीकांत यांचे चाहते कुली पाहण्याचं आवाहन करत आहेत.
या सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर कुलीने चाहत्यांमध्ये माहोल तयार केला होता. रिलीजच्या अगदी काही दिवस अगोदर सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. बॅाक्स अॅाफिसवर कुली जलवा करत असून हृतिक आणि ज्युनिअर एनटीआरच्या वॅार २ पुढं तगड आव्हान उभं करताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘कुली’ने पहिल्या दिवशी भारतात अंदाजे 65 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. परदेशातही या सिनेमाला चांगलं ओपनिंग डे कलेक्शन मिळवता आलं आहे. हा आकडा ७५ कोटी रुपये इतका आहे. आता दुसऱ्या दिवशीचा कुलीचा बॅाक्स अॅाफिसचा कलेक्शनचा आकडा समोर आला आहे. दुसऱ्या दिवशीही या सिनेमाने ५३.५० कोटी रुपये कमावले आहेत.
रजनीकांत यांनी घेतलं २०० कोटीं रुपये मानधन?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन दिवसांत कुलीने तब्बल ११८ कोटी ५० लाख रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ६५ कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी ५३.५० कोटी रुपये कमावले आहेत. यामुळे विकेंटमध्ये कुली आणखी गल्ला गोळा करू शकतो असं सिनेमा तज्ञांचा अंदाज आहे. खरंतर कुलीच बजेट तब्बल ३५० कोटी रुपये आहे. तर रजनीकांत यांनी २०० कोटी रुपये मानधन घेतल्याच्या बातमीही समोर आली आहे. रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात नागार्जुन, श्रुती हसन आणि आमिर खान यांचे खास कॅमिओ आहेत.





