Ajit Pawar : “कोणी कुठे तरी लाईन मारायला जाल, तर…”; रोड रोमियोंना अजित पवारांकडून सज्जड दम, म्हणाले “शेवटी बदनामी बारामतीची होते”.

Ajit Pawar : काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आले होते. काही उद्घाटनांच्या कार्यक्रमांनी त्यांनी हजेरी लावली. एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी रोड रोमियोंना आणि टवाळखोरांना कडक शब्दांत सुनावलं आहे. तसेच कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कोणाची दहशत खपवून घेतली जाणार नाही कुणाालाही अजिबात सोडणार नाही असंही अजित पवारांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांनी रोड रोमियोंना आणि टवाळखोरांना सज्जड दम देत कोणी कुठे तरी लाईन मारायला जाल. तुझी लाईनच काढतो आणि टायराखाली घेतो, अशा शब्दांत त्यांनी दम दिला आहे. कोणाची दहशत खपवून घेणार नाही, कुणालाही अजिबात सोडणार नाही. त्यामुळे वेळीच शहाणे व्हा, कायदा हातात घेऊ नका, बाबासाहेबांनी संविधान आणि कायदा समाजाच्या भल्यासाठी दिला आहे असंही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
….शेवटी बदनामी बारामतीची होते.
यावेळी बोलताना अजित पवारांनी बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरून कडक भूमिका घेतली. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून कामासाठी लोक येतात. मात्र, एकाने आठ वर्षांच्या मुलीवर तीही उत्तर प्रदेशची असताना अत्याचार केला. शेवटी बदनामी बारामतीची होते, असं त्यांनी सांगितलं. अशा गुन्हेगारांना अजिबात सोडू नका. त्यांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करावा, अशा सूचना त्यांनी भरकार्यक्रमातून पोलिसांना दिल्या. यामुळे यंदाच्या अजित पवारांचा बारामती दौऱ्याची जोरदार चर्चा होत आहे.
अजित पवारांकडून आवाहन
“कुणी कुठेतरी लाइन मारायला गेला तर तुझी लाइनच काढतो आणि टायरखाली घेतो. कुणालाही सोडणार नाही. प्रत्येकाने कायदा हातात घेऊ नये, कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहावी. त्यात कोणाची दादागिरी गुंडगिरी असता कामा नये, सर्वांनी शिस्तीचे पालन करावं.” असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी बोलताना केलं आहे.
हेही वाचा : कश्मीरा शाह अडकली वाहतूक कोंडीत; व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप





