Pune News : ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात आगीची घटना; अग्नीशमल दलाच्या दोन गाड्या दाखल, नेमकं काय घडलं?
Pune News : शहरातील ऐतिसाहिक शनिवारवाडा परिसरात आग लागल्याची घटना घडलेल्या खळबळ उडाली आहे.

Pune News : पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाडा परिसरात आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारवाड्याच्या मुख्य गेटजवळ साठलेला कचरा आणि वाळलेल्या लाकडांनी पेट घेतल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. Pune News
आज दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. कचरा आणि वाळलेल्या लाकडांनी अचानक पेट घेतल्याने आगीचे धुराचे लोट ४० ते ५० मीटर पर्यंत पसरले.
आग लागल्याची माहिती मिळताच मोठी धावपळ झाली. अग्निशमल दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सध्या पुण्यात तापमान वाढलेले असून कडाक्याचे ऊन पडत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे वाळलेला कचरा आणि लाकडांनी पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा : Bhoot Bangla Teaser : जबरदस्त कॅामेडी अन् हॅार्ररचा तडका! अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’चा टीझर आऊट




