Radha Patil : पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट! नृत्यांगना राधा पाटीलसह आयोजकांवर बिबवेवाडीत गुन्हा दाखल
Radha Patil : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटील आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Radha Patil : यंदाच्या दहीहंडी उत्सवात विविध मनोरंजन कार्यक्रमांची मोठी चर्चा झाली. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातही लावणी नृत्यांगणा आणि बिग बॉस फेम राधा पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राधा पाटीलसह तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Radha Patil)
मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवातील मनोरंजन कार्यक्रमांमध्ये अश्लील नृत्य किंवा आक्षेपार्ह सादरीकरण होऊ नये, यासाठी संबंधित कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, आवश्यक प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे संबंधित कार्यक्रमाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. (Radha Patil)
असे असतानाही बिबवेवाडी परिसरात राधा पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत राधा पाटीलसह आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Radha Patil)
राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा
या प्रकरणात लावणी नृत्यांगणा राधा पाटील, एम्पायर ग्रुप ए.के. बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Radha Patil)
पोलिसांच्या माहितीनुसार, कार्यक्रमासाठी आवश्यक असलेली अधिकृत कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नसल्याने कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप आहे. (Radha Patil)
कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, राधा पाटीलच्या नृत्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओतील काही नृत्यहावभावांवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला असून, काहींनी कार्यक्रमाचे समर्थन केले आहे. (Radha Patil)
मात्र, गुन्हा दाखल होण्यामागील मुख्य मुद्दा आवश्यक प्रमाणपत्र आणि कार्यक्रमाच्या परवानगीशी संबंधित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. (Radha Patil)






