जाणून घ्या… मिलिंद सोमणचे डाएट सिक्रेट

मॉडेल, ऍक्टर मिलिंद सोमणच्या फिटनेसची खूप जास्त चर्चा होत असते. वयाच्या तुलनेत अगदी व्यवस्थित मेन्टेन केलेला फिटनेस हा युवकांनाही लाजवेल असाच आहे. सगळे जण त्याला या फिटनेसचे रहस्य विचारत असतात.
View this post on Instagram
अखेर मिलिंद सोमणने आपल्या फिटनेसचे रहस्य उघड केले आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये मिलिंद सोमणने आपला डाएट प्लॅन शेअर केला आहे. सकाळी आणि संध्याकाळी काय आहार आहे, यानुसार आपला डाएट प्लॅन बदलत असतो, असे मिलिंदने म्हटले आहे.
View this post on Instagram
तो दररोज सकाळी उठल्या उठल्या किमान अर्धा लीटर कोमट पाणी पितो. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये केवळ फळांचा समावेश केलेला असतो. दुपारच्या जेवणात नेहमीच त्याला मुगाची खिचडी लागते. त्याशिवाय सिझनल भाज्याही असतात. घरगुती देशी तूप तो आवर्जुन घेतो.
View this post on Instagram
संध्याकाळच्या चहासाठी साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला असतो. हा चहा दुधाशिवाय म्हणजे ब्लॅक टी असतो. रात्रीच्या जेवणात पुन्हा खिचडी आणि हिरव्या पालेभाज्या असतात. नॉनव्हेज अजिबात नाही.
View this post on Instagram
रिफाइंड, प्रोसेस्ड आणि पॅक्ड फूड मिलिंद अजिबात खात नाही. कोणत्याही प्रकारच्या व्हिटॅमिनच्या गोळ्याही तो घेत नाही. मद्य तर वर्षातून एखाद्वेळेसच घेतो. या जोडीला नियमित व्यायाम असतोच.
View this post on Instagram





