Maharashtra Politics : अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीकडे अर्थखाते!; सुनेत्रा पवार यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाणार?
Maharashtra Politics : महायुती सरकारमधील महत्त्वाच्या अशा अर्थ आणि नियोजन खात्यावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Maharashtra Politics : महायुती सरकारमध्ये अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. मात्र, दुष्काळ निधीचे वाटप आणि इतर तांत्रिक बाबींमुळे या निर्णयाला काहीसा वेळ लागत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. (Maharashtra Politics)
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अर्थखात्याच्या मागणीसाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics)
छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची अर्थखात्याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. महायुती स्थापन करताना ठरल्यानुसार हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाले पाहिजे, अशी भावना आमच्या आमदारांची आहे आणि ती रास्त आहे. (Maharashtra Politics)
मुख्यमंत्री या संदर्भात अत्यंत सकारात्मक आहेत. त्यांनी हे खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले जाईल असे आश्वस्त केले आहे. आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. (Maharashtra Politics)
विलीनीकरणाविषयी ते म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा किंवा पक्षाच्या विलीनीकरणाचा कोणताही विषय आमच्या अजेंड्यावर नाही. यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. (Maharashtra Politics)
यावरून माध्यमांमध्ये तर्कवितर्क लावले जात असल्याने आम्ही यावर स्पष्टीकरण देत आहोत. तसेच, मंत्रिमंडळात इतर कोणतेही मोठे फेरबदल होणार नसून, पक्षाने केवळ अर्थखात्याचीच मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय नाही
सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना मोठा निधी द्यावा लागणार आहे. यावर सरकारचा सखोल अभ्यास आणि नियोजन सुरू असल्यामुळेच अर्थखात्याच्या निर्णयाला वेळ लागत आहे. (Maharashtra Politics)
तसेच, पक्षातील एका रिक्त मंत्रीपदाच्या शपथविधीबाबत विचारले असता, फक्त एका मंत्र्यांचा वेगळा शपथविधी होईल असे वाटत नाही. भाजपचेही काही मंत्रीपद रिक्त असून संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार एकाच वेळी होईल. (Maharashtra Politics)





