Maharashtra Politics : मोठी घडामोड..! अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 5 जणांचं मंत्रिपद जाणार? चर्चाना उधाण
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल पाच मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात आल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलांच्या चर्चांना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पक्षातील पाच मंत्र्यांची मंत्रिपदे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. (Maharashtra Politics)
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनीही या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics)
राष्ट्रवादीच्या पाच मंत्र्यांची गच्छंती होणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, अशी मागणी करण्यात आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
दरम्यान, पक्षातील नऊ मंत्र्यांपैकी पाच मंत्र्यांना बदलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले. मात्र, मंत्र्यांची नावे किंवा मंत्रिपदे बदलण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. (Maharashtra Politics)
अंबादास दानवे काय म्हणाले?
या चर्चांवर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली सुरू झाल्या की मंत्रिमंडळातील बदलांच्या चर्चा सुरू होतात, असे म्हटले. मंत्र्यांची खाती किंवा मंत्रिपदे बदलण्याबाबतच्या चर्चांकडे सावधपणे पाहण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (Maharashtra Politics)
अर्थखात्याच्या मागणीवर बोलताना दानवे यांनी भाजप हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देईल, असे आपल्याला वाटत नसल्याचे मत व्यक्त केले. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे खाते पुन्हा पक्षाला मिळावे, अशी मागणी केली आहे. (Maharashtra Politics)
छगन भुजबळांनी चर्चांना पूर्णविराम दिला?
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पाच मंत्री बदलले जाणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. मंत्र्यांमध्ये फेरबदल किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थखात्याच्या मागणीवर सकारात्मक चर्चा झाल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. (Maharashtra Politics)





