नवी दिल्ली : आर्थिक मंदीवरून मागील काही दिवसांपासून टीकेला तोंड देत असलेल्या केंद्र सरकारने कंपन्यांसाठी आज मोठी घोषणा केली आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर कपात जाहीर केली. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे कॉर्पोरेट उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला आहे.
FM Sitharaman: To promote growth, a new provision has been inserted in the income tax act with effect from fiscal year 2019-20, which allows any domestic company to pay income tax at the rate of 22% subject to condition they will not avail any incentive or exemptions pic.twitter.com/6BuykamM1J
— ANI (@ANI) September 20, 2019
जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे. आज आम्ही देशी कंपन्या आणि नवीन देशांतर्गत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कर दर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवत असल्याचे त्यांनी म्हटले. या नव्या घोषणेनुसार कंपन्यांसाठी नवीन कॉर्पोरेट कर दर 25.17 टक्के निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय कंपन्यांना यापुढे आणखी कर भरावा लागणार नाही.