अखेर प्रतीक्षा संपली.! ‘द फॅमिली मॅन ३’बाबत मनोज वाजपेयींनीच केला खुलासा, ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री !

Manoj bajpayee | family man season 3 : अभिनेता मनोज बाजपेयीने प्राइम व्हिडिओच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजच्या दोन्ही सीझनमधून अनेक लोकांची मने जिंकली. या मालिकेत त्याने श्रीकांत तिवारीची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली. बऱ्याच काळापासून चाहते श्रीकांत तिवारीला पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा बाळगत आहेत, म्हणजेच ‘द फॅमिली मॅन सीझन ३’ ची वाट पाहत आहेत. आता मनोज स्वतः यावर बोलले आहेत.
‘द फॅमिली मॅन’चा दुसरा सीझन ४ जून २०२१ रोजी आला. म्हणजे जवळजवळ चार वर्षे झाली आहेत. तेव्हापासून चाहते तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. ओटीटी प्लेशी बोलताना, मनोजला विचारण्यात आले की तो ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनबद्दल काय सांगू शकेल. यावर तो म्हणाला, “तिसरा सीझन नोव्हेंबरमध्ये येत आहे.” असं त्याने स्वतः सांगितलं आहे.
मनोज बाजपेयी म्हणाले की, जयदीप अहलावत देखील तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. जयदीपबद्दल बोलताना मनोज म्हणाला, “पाताल लोकच्या दुसऱ्या सीझनमध्ये जयदीपने उत्तम काम केले. दीड वर्षांपूर्वी आम्ही त्याला ‘फॅमिली मॅन’ मध्ये कास्ट केले होते आणि तो तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.”
मनोजने स्पष्ट केले की आपल्याला २०२५ मध्ये तिसरा सीझन पाहायला मिळेल आणि यावेळी जयदीप अहलावत देखील त्याच्यासोबत दिसणार आहे. आता दोघांना एकत्र पाहणे रंजक ठरणार आहे. सध्या चाहते तिसरा सिझनची वाट पाहत आहेत.
पहिला सीझन कधी आला?
राज आणि डीके दिग्दर्शित ‘द फॅमिली मॅन’चा पहिला सीझन २०१९ मध्ये आला. पहिल्या सीझनपासूनच लोक या मालिकेचे वेड लागले. त्यानंतर, दुसऱ्या सीझनला लोकांकडून आणखी प्रेम मिळाले. आता तिसऱ्या सीझनमध्ये श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत पुन्हा एकदा परतणारा मनोज बाजपेयी यावेळी लोकांवर कोणती जादू करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





